जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे सार्वजनिक ठिकाणांच्या अग्नी सुरक्षेला मिळणार गती

 


उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जिल्हयातील सर्व शासकीय,निमशासकीय रुग्णालयांचे आदी सार्वजनिक ठिकाणच्या  अग्नीसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण आणि विद्यूत सुरक्षा तपासणी कालबद्ध कालावधीत करण्यासाठी एक समिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी  येथे जाहिर केले आहे.

 या समितीत सात सदस्य आणि एका सदस्य सचिवांच्या समावेश आहे.   यात सदस्य म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल सगर,जि.प.च्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. भोसले,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के.पाटील, जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हणमंत वडगावे ,  लातूर येथील आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले,जि.प.चे शिक्षणधिकारी (माध्यमिक) गजानन सुसर,औरंगाबाद येथील उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक यांचा  तर सचिव म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती वर्षाली तेलोरे यांचा समावेश आहे.

 अन्न सुरक्षा परीक्षण तसेच विद्यूत सुरक्षा परीक्षण तपासणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्य समितीत जिल्हा अग्नीश्मन अधिकारी विद्यूत निरीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्यूतचे कार्यकारी अभियंता यांचा समावेश आहे.

 जिल्ह्यातील  शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, नगर परिषदा तसेच विशेष नियोजन प्राधिकरण कार्यक्षेत्रातील शासकीय ,  निमशासकीय रुग्णालयातील अग्नीसुरक्षा व्यवस्थेचे परिक्षण तसेच विद्युत सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. तसेच याबाबतची प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने होणे  आवश्यक आहे. त्यामुळे  उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शासकीय  ,  निमशासकीय रुग्णालयाचे अग्नी सुरक्षा व्यवस्थेचे परिक्षण आणि विद्युत सुरक्षा तपासणी कालबध्द कालावधीत करण्यासाठी तसेच सदर परिक्षण , तपासणी गुणात्मक, कालबध्द  आणि  नियोजनपूर्वक होण्यासाठी जिल्हास्तरावर ही   समिती स्थापित करण्यात अली आहे.

 ही समिती परिक्षणापूर्वी संबंधित रुग्णांलयाकडून सोबत जोडलेल्या चेकलिष्ट प्रमाणे अग्नी सुरक्षा परिक्षणाकरीता आणि विद्युत तपासणी करिता आवश्यक असणारी माहिती परिक्षण/तपासणी समिती’ला सादर करेल.आग  प्रतिबंधक व जीव संरक्षण  उपायोजना करीता महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 अन्वये आयुक्त, आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी दिलेल्या पत्रान्वये प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

 उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयांनी www.mahafireservice.gov.in या संकेतस्थळावर नोदणीकृत केलेले अनुज्ञप्तीधारक अभिकरणाची यादी उपलब्ध करून घेवून फायर सेफ्टी ऑडीट करावयाचे . फायर सेफ्टी ऑडीटबाबत नियंत्रण जिल्हा शल्यचिकीत्सक,यांचे राहील. जिल्हा आपत्ती  व्यवस्थापन अधिकारी यांनी जिल्हा अग्नीशमन प्राधिकरण यांच्या मदतीने सर्व आरोग्य

 सेपटीच्या अनुषंगाने कर्मचा-यांचे फायर सेफ्टीबाबत प्रशिक्षण घेण्यात यावे तसेच वर्षातून किमान एकदा Mockdrill घेण्यात यावे. याबाबतची संस्थानिहाय माहिती  तयार करण्यात यावी.सर्व आरोग्य संस्थांमध्ये आय सी यू, एचडियू, एसएनसीयु ऑक्सीजन प्लॅट तसेच इतर कक्षामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या विद्युत उपकरणांचे Electircal Safty inspection  करुन घेण्यात यावे.केंद्रीय विद्युत प्राधिकरण (सुरक्षा व विद्यूत पुरवठा संबधीचे उपाय विनियम २०१० मधील विनियम क्र.30 प्रमाणे जेथे ग्राहकाची विद्युत संच माडणी वीज पुरवठा वाहकास जोडली आहे. अशा ग्राहकांची विद्युत संच माडगी ही पाच वर्षातून एकदा निरीक्षक करुन घेणे बंधनकारक आहे.

 नोटीफाइड होल्टेज (११ केव्ही) व त्यावरील होल्टेज असलेली वीज संच माडणी व वीज कायदा  2003 च्या कलम ५४ अतर्गत येणा-या बीज संच मांडणीचे निरीक्षण विद्युत निरीक्षक यांच्याकडूनच करून घेणे बंधनकारक आहे. विद्युत सुरक्षा परिक्षण (Electircal Safty Audit करण्यासठी दक्षता ब्युरो  Bureau of Energjy Efficiency यांच्या मार्फत  प्रमाणित केलेले व नोंदणीकृत अनुज्ञप्तीधारक अभिकरणामार्फतच करून घेणे गरजेचे आहे. विद्यूत  सुरक्षा परिक्षण व ऊर्जा ऑडिट करून घेणेसाठी नोंदणीकृत अनुज्ञप्तीधारक अभिकरणामार्फत करुन घेणे गरजेचे आहे. विद्युत सुरक्षा परिक्षण व ऊर्जा ऑडिट करुन घेण्यासाठी नोंदणीकृत अनुज्ञप्तीधारक अभिकरणाची यादी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) यांचे संकेतस्थळ www.mahaurja.com वर यादी उपलब्ध आहे.त्याच्याकडून खाजगी रुग्णांलयांनी Electircal Safry insetection  व Aubit करुन घ्यावी.  याबाबतीत जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा रुग्णांलय उस्मानाबाद यांचे  राहील. अनीसुरक्षा परिक्षण तसेच विद्युत सुरक्षा परिक्षण तपासणी करण्यासाठी स्थापन केलेली समिती सर्व शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय निमशाससकीय रुग्णांलयाचे अनीसुरक्षा परिक्षण तसेच विद्युत सुरक्षा तपासणी करेल. तसेच अन्नी व विद्युत उपकरणापासून होणाऱ्या  दुर्घटना टाळण्यासाठी कारवायाच्या उपाययोजनां बाबत  ही समिती वेळोवेळी आढावा घेवून उपाययोजनां सूचवेल .  ऊर्जा सुरक्षा  उपरोक्त दोन्ही समित्यां मासिक आढावा घेण्यात येणार असून जिल्ह्यातील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय रुग्णालयाचे आणि खाजगी रुग्णांलयाचे  अग्नीसुरक्षा परिक्षण व विद्यूत सुरक्षा  तपासणी परिक्षण तात्काळ होण्याबाबत सर्व संबधितांनी उचित कार्यवाही करावी.

 त्याचप्रमाणे उपरोक्त प्रमाणे समितीही उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय निमशासकीय/ खाजगी रुग्णालये तसेच शासकीय / खाजगी महाविद्यालय, शाळा आदिवासी विकास विभाग तसेच समाजकल्याण विभागाचे विद्यार्थी वसतिगृह तसेच मंगल कार्यालय / हॉल यांचेही  अग्नीगुरक्षा परिक्षण fire safety Audit विद्युत सुरक्षा तपासणी  व परिक्षण Electircal Safty Inspection And audit  करेल. तसेच परिक्षाणात /तपासणीत आढळलेल्या त्रुटींचे निराकरण  करण्यासाठी नियमोचित कार्यवाही करून अहवाल  जिल्हाधिकारी यांना सादर करील.

 
Top