तुळजापूर / प्रतिनिधी- 

तिर्थक्षेञ तुळजापूरात उभारण्यात  येणाऱ्या डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या संकल्प चिञाचा लोकार्पन सोहळ्याचे प्रकाशन   तुळजापुर नगरपरिषद कार्यालयात  नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी पञकार परिषदेत बोलताना म्हणाले की, महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या बाबतीत बऱ्याच वर्षापासुन मागणी होती.

  डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे काम सध्या लवकरात लवकर हाती घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सध्याच्या सुधारीत रेट नुसार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या सुशोभिकरण्यासाठी १ कोटीचा आरखडा तयार करण्यात आला आहे.  प्राधिकरणाच्या बैठकीत अंतिम मंजुरी घेवुन लवकरच राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष संगिता कदम, नगरसेवक किशोर साठे, औंदुबर कदम, रिपल्बिकनचे तानाजी कदम, नगरसेवक विजय कदंले, युवा नेते सागर कदम , नगरअभियंता प्रशांत चव्हाण आदीची उपस्थित होती.

 
Top