उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील ब्रीज जवळ लातूर बार्शी रोडवर उस्मानाबाद ग्रामिण पोलीसांनी गांजाची वाहतूक करणार्या कारसह तीन जणांना ताब्यात घेतले तर ड्रायव्हर फरार झाला आहे.

याबाबत अधीक माहिती अशी की उस्मानाबाद ग्रामिण पोलीसांना गोपनीय खबऱ्याच्या आधारे एक कार गांजा घेऊन येत असल्याचे समजले.

उस्मानाबाद ग्रामिण पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी रसत्यावर सापळा लावला दि.१५/४/२०२१(गुरुवारी) रात्री १० वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील ब्रीज जवळील हाँटेल कालिका जवळ एक काळ्या रंगाची वेरना कार अडवली दरम्यान पोलीसांची नजर चुकवून ड्रायव्हर फारार झाला तर दोन पुरुष व एक महिलेला पोलीसांनी पकडले.

दरम्यान गाडीसह जप्त करुन तिन जणांना पोलिस ठाण्यात आणले आहे. पोलीसांनी गाडीची झाडाझडती घेतली असता कारमध्ये २७ किलो ९०० ग्रँम गांजा आढळून आला आसून पोलीस हि कारवाई रात्रभर करत होते दि.१५ /४/२०२१ रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया उस्मानाबाद ग्रामिण पोलीस ठाण्यात सुरु होती.

पून्हा एकदा उस्मानाबादच्या पोलीसांचे या कारवाईमुळे कौतुक होत आहे.

 हि कारवाई पोलिस अधिक्षक राजतिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद ग्रामिण पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दत्तात्रय सुरवसे , सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश शिंदे ,हवलदार तुगावकर ,पोलीस नाईक पाटिल ,पोलीस नाईक मोराळे ,पोलीस शिपाई खांडेवराड यांनी हि कारवाई यशस्वी पार पाडली.


 
Top