कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश 


उस्मानाबाद / प्रतिनिधी - 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा व संसर्ग कमी होत नसल्याने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी संचारबंदी काळातील निर्बंध आणखी कडक केले आहेत . अत्यावश्यक सेवा वगळता संचार बंदीत सूट दिलेली इतर दुकाने व आस्थापना आता सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली राहणार असून त्यानंतर ही दुकाने बंद होणार आहेत.

हॉस्पिटल , सार्वजनिक वाहतूक , मालवाहतूक , पेट्रोल पपं, विद्युत व गॅस पुरवठा , एटीएम , अत्यावश्यक सेवासाठी खासगी वाहतूक व बसेस या 24 तास सुरू राहतील तर संचारबंदीत सूट मिळालेली दुकाने आस्थापना या सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत खुली राहतील

विनाकारण रस्त्यावर बाहेर फिरणाऱ्या नागिरकानावर कारवाई होणार आहे. अत्यावश्यक सेवात समाविष्ठ सेवा , मेडिकल हॉस्पिटल हे मात्र  24 तास सुरू राहणार आहेत तर कडक संचारबंदी लागू करण्यासाठी प्रशासन आता ठोस पाऊल उचलत आहे.

नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांनी दिला आहे.




 
Top