उस्मानाबाद/प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यासह शहरात कोरोनासह सारी रोगाने आपले भिषण रुप दाखवायला सुरुवात केली आहे शहरतील कपीलधार,पांढरी ,व मुस्लीम स्मशानभुमीत शुक्रवार दि.16एप्रिल रोजी एकुण 23जणांवर अंत्यसंस्कार कारण्यात आले.

येथील.सामाजीक कार्यकर्ते नाना घाटगे यांनी दिलेल्या माहीती नुसार कपीलधार स्मशानभुमीत 18जणांवर तर पांढरी स्मशानभुमित 3 जणांवर तर मुस्लीम स्मशानभुमीत2 जणांवर अंत्यविधी करण्यात आला तर सारीमुळे मृत्यू पावलेल्या  9 रुग्णांचे मृतदेह त्यांच्या  नातेवाईकाकडे सोपवण्यात आले आहे.        

 आम्ही या संदर्भात अधिकृत माहीती घेण्याचा प्रयत्न केला असता पुर्णा कागदपञ पाहुन सांगावे लागेल त्याला उशिर लागेल असे आरोग्य विभागाने      सांगितले  तर न.प. मुख्याधिकारी यांनी सदर माहीती रुग्णालयातुन घ्या असे सांगितले  एकंदर परस्थिती भयाण होत असल्याची जाणीव होत आहे

 
Top