उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्ह्यात मागील 1५ दिवसात कोरोनामुळे ८ वकिलांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला यात अनेक ज्येष्ठ मंडळींचा समावेश आहे. 

फौजदारी क्षेत्रातील ज्येष्ठ व नामांकित वकील अशी राज्यभर ओळख असलेले 62 वर्षीय अँड दत्तात्रय उर्फ आबा बारखडे, 46 वर्षीय अँड भारती रोकडे, अँड विनोद गंगावणे ( वय 45 ) अँड बापूसाहेब गंजे (वय 53 ) अँड नारायण वडणे ( वय 45 ) व उमरगा येथील ॲड.रवींद्र बिराजदार ( वय 44 ) व  अँड.राम अनंतराव कुलकर्णी‌ , दिवाणी प्रकरणातील प्रख्यात वकिल ॲड अरूण जी महामुनी  उर्फ आण्णा  आदी ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

वकीलासाठी कसलेही सुरक्षा कवच नाही,त्यांच्या मागे वारसांना कसलीही आर्थिक सुरक्षा नाही, वकिलाचा अनेक बाबतीत थेट संपर्क पक्षकाराशी येतो त्यामुळे वकिलांना कोरोना संसर्ग जास्त आहे. वकील लोकांना तातडीने लसीकरण करण्याची गरज आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील ८ वकिलांचा मृत्यू या लाटेत झाला आहे.अनेक वकिलांचे नातेवाईक यात बळी पडले आहेत.वकिलांच्या वारसांना शासनाने मदत करण्याची आवश्यकता आहे. शासनाने वकिलांच्या वारसांना तात्काळ 25 लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी जिल्हा विधिज्ञ मंडळचे अध्यक्ष अँड नितीन भोसले यांनी केली आहे.

 
Top