उस्मानाबाद / प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून आज कोरोना रुग्णांच्या संख्येने चारशेचा आकडा पार केला. आज नवीन 423 रुग्ण सापडले व 2 जणांचा मृत्यू झाला तर 197 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोना रुग्णांची रोजची संख्या 400 च्या जवळपास जात असून सक्रिय रुग्णाची संख्या 2 हजार 522 झाली आहे.कोरोनाची कोणतीही लक्षणे असल्यावर ती अंगावर न काढता तात्काळ रुग्णालयात जाणे गरजेचे आहे आहे असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे. जिल्ह्यात आज रॅपिड तपासणीत 337 रुग्ण व आरटीपीसीआर चाचणीत 86 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाने मृत्यू झाल्याची संख्या आता 604 झाली आहे.

उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 262 रुग्ण सापडले तर तुळजापूर 32, उमरगा तालुक्यात 37 रुग्णांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 2 हजार 522 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. उस्मानाबाद शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1 लाख 64 हजार 172 नमुने तपासले त्यापैकी 22 हजार 128 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर 17.15 टक्के आहे. जिल्ह्यात 18 हजार 947 रुग्ण बरे झाले असून 85.62 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 604 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.73 टक्के मृत्यू दर आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात आज 262 रुग्ण , तुळजापूर 32, उमरगा 37, लोहारा 13, कळंब 30, वाशी 24, भूम 15 व परंडा तालुक्यात 10 रुग्ण सापडले आहेत

 
Top