तुळजापूर / प्रतिनिधी- 

तालुक्यातील सिंदफळ येथील पैलवान दत्ताञय (बबलु)महादेव  धनके यांची पुढील महिन्यात पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धसाठी सत्तावन किलो वजन गटातुन निवड झाली आहे.कोरोना पार्श्वभूमीवर समस्यांचा  सामना करीत  पैलवान धनके यांची ही निवड मोलाची ठरत आहे. उस्मानाबाद जिल्हास्तरीय स्पर्धा नुकतीच कळंब तालुक्यातील कोथळा येथे संपन्न झाली होती यात  पैलवान बबलु धनके यांची निवड करण्यात आली.

बबलु धनके यांच्या घरीची परिस्थिती बेताची असुन वडील श्रीतुळजाभवानी मंदीरातुन नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. पैलवान बबलु धनके हा कोल्हापूर येथील न्यु मोतीबाग तालीमीत प्रशिक्षण घेत होता कोरोना मुळे तालीम बंद झाल्यानै तो गावाकडे आला आता तो सुधीर पाटील यांच्या हातलाई मैदानावर कुस्तीचे धडे घेत आहे.पैलवान बबलु धनके हा सध्या सिंदफळ येथुन पहाटे साडेतीन वाजता निघुन तो चार वाजता हातलाई मैदानावर जावुन वस्ताद सुंदर जवळगेकर यांच्या मार्गदर्शन खाली प्रशिक्षण घेत आहेत. यापुर्वी विविध गटात पैलवान बबलु धनके यांची चार वेळा महाराष्ट्र केसरीसाठी निवड झाली होती .त्यांनी चारवेळा सेमी फायनल क्वार्टर फायनल पर्यत मजल मारली होती.


 
Top