उमरगा / प्रतिनिधी

मुरुम येथे आयोजित करण्यात आलेल्या काका चषक खुल्या टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये ११० संघ सहभागी झाले होते. एक महिना चाललेल्या घमासानमध्ये मुरुम येथील महात्मा बसवेश्वर संघाने अजिंक्यपद पटकावले तर

सेव्हन स्टार भुसनी या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.  मुरूम येथे शरणजी पाटील मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या खुल्या टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेत एकशे दहा संघाने सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, गुलबर्गा या जिल्ह्यातील संघाने सहभाग नोंदवला.

काका चषक अंतिम सामना रविवारी (दि.२८) महात्मा बसवेश्वर संघ, मुरूम व सेव्हन स्टार भुसनी या दोन संघात अटीतटीचा सामना झाला. या सामन्यात महात्मा बसवेश्वर संघाने विजय मिळवला. त्यामुळे या संघाला शरणजी पाटील मित्रमंडळाच्या वतीने प्रथम पारितोषिक एक लाख रुपये रोख व चषक व द्वितीय पारितोषिक डॉ.विशाल रमेश पवार यांच्यातर्फे ५१ हजार रुपये व  चषक तृतीय पारितोषिक उमरगा पं. स.सभापती सचिन पाटील यांच्या वतीने ३१ हजार रुपये रोख व चषक ,अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार प्राचार्य प्रवीण गायकवाड यांच्याकडून पाच हजार रु रोख व चषक जि. प.विरोधी पक्षनेते शरण पाटील , अॅड. नानासाहेब पाटील, उमरगा पंसचे सभापती सचिन पाटील,  जि. प.सदस्य रफिक तांबोळी, प्रशांत पाटील, नगरसेवक रशीद गुत्तेदार, श्रीकांत बेंडकाळे,गौस शेख, सुधीर चव्हाण, राजु मुल्ला आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला बक्षीस वितरण करण्यात आले. पंच म्हणून गुलाब आडके, बसवराज आडके तर समालोचन किरण गायकवाड , अमोल बनसोडे, पंडित मुदकन्ना यांनी केले.

 स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुल वाघ, देवराज संगुळगे, ओंकार पाटील, सूरज कांबळे, सचिन उर्फ झुंबर बनसोडे, राजू मुल्ला, उत्कर्ष गायकवाड, गौरीशंकर बोंगरगे, शिवा दुर्गे, श्रीहरी पाटील, जिंदावली संण्णाटे, ईश्वर कडगंचे, अभि कुलकर्णी,प्रणीत गायकवाड,सागर खुणे आदींनी परिश्रम घेतले.

 
Top