उस्मानाबाद / प्रतिनिधी

 गॅससह पेट्रोल, डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. यामुळे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर जाऊन आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

गॅस सिलिंडरसह इंधन दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तीन वेळा गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली असून अनुक्रमे २५, ५०, २५ इतकी झाली अाहे. मार्च महिन्यात पहिल्याच दिवशी २५ रुपये वाढ झाली. गॅस सिलिंडरचा आजचा भाव ८२७ रुपये असून स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिन्यात इतकी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य जनता, गृहिणी त्रस्त झाल्या आहेत. त्यांचे जगणे असह्य झाले असून किचन बजेट कोलमडले आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण न करणारे मोदी सरकार असून इंधन दरवाढ, महागाईमुळे मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.२) महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सूचनेनुसार उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रोहित पडवळ, तुळजापूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मकरंद डोंगरे, बिभीषण हजारे, विलास कोरेकर, विजयसिंह घोगरे, विशाल हजारे, संजय कोरेकर, दिनेश डोंगरे, राजपाल पडवळ, प्रविण पडवळ, इंद्रजीत हजारे, प्रमोद बचाटे, सुभाष पाचपुंडे यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

 
Top