तुळजापूर / प्रतिनिधी

अामदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या आमदार निधीमधून बोरी नदी खोलीकरण, रुंदीकरणासाठी ३ लाख रुपयांचा निधी दिला आहे. निधीचे पत्र नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचा हस्ते देण्यात आले. याशिवाय युवक नेते विनोद गंगणे यांनी ११ हजार रुपये तसेच नगरसेवक पंडीतराव जगदाळे यांनी ५ हजार रुपयांची मदत केली आहे. तुळजापूर खुर्द जवळून वाहणाऱ्या बोरी नदी पात्राचे लोकसहभागातून खोलीकरण व रुंदीकरण सुरू आहे. या कामाला सहकार्य म्हणून आ. पाटील यांच्या आमदार निधीतून मदत देण्यात आली. यावेळी पंकज शहाणे,विनोद गंगणे,पंडीतराव जगदाळे, विशाल रोचकरी, विजय कंदले, राजाभऊ देशमाने यांच्यासह शाम भोजणे, जयाजी जगदाळे आदी उपस्थित होते.

२०१६ साली तुळजाई मंडळाने लोकसहभागातून बोरी नदीचे खोलीकरण व रुंदीकरण केले होते. ४ एप्रिल ते २५ मे २०१६ पर्यंत चाललेल्या या कामात २ पोकलेनच्या सहाय्याने उस्मानाबाद रोड ते लातूर रोड ३ किलोमीटर लांबीचे काम करण्यात आले होते. यावेळी १० लाख ७० हजार रुपये खर्च आला होता.

Top