कळंब / प्रतिनिधी

कळंब नगर पालीकेची सर्वसाधारण सभा मा. सौ. सुवर्णा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  या सभेत शहर विकासाच्या दृष्टीने एकूण सतरा विषय खेळीमेळीच्या वातावरणात एकमताने मंजूर करण्यात आले.  यात विषय क्रं 4 नुसार शहरालगत कचरा संकलनासाठी डेपोसाठी शासन मालकीची जागा मिळावी म्हणून सर्वानुमते मंजुरी दिली गेली. सदर विषयावर मध्यंतरी मा. उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांनी शासन मालकीच्या जागेचा सातबारा आणून द्या जागा देतो म्हटले होते व त्याबाबत  जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी वर्गाला ही मा. उपमुख्यमंत्री बोलले होते. त्या अनुषंगाने आजचा ठराव शहराची समस्या सोडवताना महत्वाचा ठरणार आहे. 

याबरोबरच मोहेकर महाविद्यालय जवळ चा एमएसइबी कडे जाणारा रस्ता, पंचायत समिती पाठीमागून स्वामी समर्थ मंदिराकडे जाणारा रस्ता व पाईपलाईन यासह अनेक कामांना मान्यता दिली गेली.

शेवटच्या सतरा क्रमांकाच्या विषयानुसार उपाध्यक्ष संजय मुंदडा यांची 9 मार्च पासून 15 मे 2021 पर्यंत ची रजा मान्य करण्यात आली. मुंदडा यांनी व्यक्तीगत कारणामुळे रजा देत असून जर काम वेळे आधी पार पडले तर आधीच रूजू होईल असे नमुद केल्यामुळे मा. अध्यक्ष सौ  सुवर्णा मुंडे यांनी महाराष्ट्र नगर पालिका व नगर पंचायत अधिनियम 1965 कलम 56 पोटकलम 2 नुसार 25 मार्च पर्यंत सौ. सफूरा शकील काझी यांना उपाध्यक्ष पदाचा पदभार सोपवला. यावेळी सभागृहाने टाळ्या गजरात व  सौ. सफूरा काझी यांना पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन सौ. सफूरा काझी यांचे अभिनंदन केले. सर्वसाधारण सभेला मा. अध्यक्ष सौ. सुवर्णा मुंडे,  संजय मुंदडा,  लक्ष्मण कापसे, शिवाजी कापसे, श्रीधर भवर, सौ. मीरा चोंदे, सौ. सफूरा काझी,  सौ. इंदुमती हौसलमल, सौ. साधना बागरेचा, सौ. गीता पुरी, सौ. अश्विनी शिंदे, सौ. सुरेखा पारख, मुश्ताक कुरेशी, अमर गायकवाड, सुभाष पवार, अनंत वाघमारे, सतीष टोणगे या सदस्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी हजर होते. 

 
Top