पाडोळी/प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी(आ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत असलेले बापूसाहेब गाडे(वय४२) यांचे आज ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. 

सकाळी तुळजाभवानी मैदानावर व्यायाम करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्या दरम्यान दवाखान्यात जात असताना त्यांचा वाटतेच मृत्यू झाला. त्यांच्या वर   उस्मानाबाद येथील कपिल धारा स्मशान भूमीत  अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. 

 
Top