उस्मानाबाद / प्रतिनिधी:

 महाराष्ट्र शासनाकडून  विविध पद्धतीने महाराष्ट्रातील सामान्य जनता, विद्यार्थी यांची सातत्याने आपल्या नकारात्मक भूमिकेमुळे सर्वांना अडचणीत आणत आहेत, या मध्ये  राज्य सेवा पूर्व परिक्षा 2020 कोवीड-19 च्या प्रादुर्भावामुळे तसेच आरक्षण निश्चितीच्या प्रकरणामुळे वारंवार पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्या मुळे सदर परिक्षेची तयारी करणाऱ्या  विद्यार्थ्यांचे  प्रचंड मानसिक, आर्थीक व  शैक्षणिक नुकसान होत आहे.   सगळ्या परीक्षा होत आहेत मग एम.पी.एस.सी. परीक्षा का नाही असा प्रश्न परीक्षार्थीना पडला आहे.  राज्य लोकसेवा आयोगाच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य  अधांतरी झाले आहे. त्यामुळे सदर एम.पी.एस.सी. परिक्षा तात्काळ घेण्यात यावी. या  संदर्भाच्या  अध्यादेशाची होळी करून निषेध व्यक्त केला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या  वतीने व एम.पी.एस.सी. अभ्यास करणारे विद्यार्थी  यांनी ज़िल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.  

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा, धाराशिवचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजे निंबाळकर, एस.सी. सेलचे जिल्हाध्यक्ष प्रविण सिरसट, सुनिल पंगुडवाले, सुरज शेरकर, विट्ठल कदम, शंकर मोरे, दादुस गुंड, प्रसाद मुंडे, वडवले व्ही. एम., जगदाळे एस. डी., राजेश्वर शिंदे, अक्षय गरड, महेश भोयटे, अतुल बोधडे, अजीत गाढवे, अनिकेत आवाड इत्यादी भाजयुमोचे कार्यकते व विद्यार्थी मोठया संख्येने हजर होते.  

 
Top