कळंब / प्रतिनिधी : - 

 तालुक्यातील अंदोरा गावच्या राजकारणात खळबळ उडाली आहे, गावातील महिला सदस्य सौ.सुमन कवडे यांनी  थेट गटविकास अधिकारी पंचायत समिती  यांना  आपला ग्रां. पं. सदस्यत्वचा राजीनामा मंजूर करण्यासाठी अर्ज दिला आहे.

    आंदोरा ही ग्रामपंचायत तालुक्यात महत्वाची मानली जाते,या ग्रामपंचायती मध्ये महिला वर्गाचे वर्चस्व आहे, यामधे सहा महिला सदस्य तर पाच पुरुष सदस्य आहेत.तर या गावच्या सरपंच पदावर ही महिला आहे,  याच ग्रामपंचातीं मध्ये निवडून आलेल्या महिला सदस्य सौ.सुमन विनायक कवडे यांनी गटविकास अधिकारी यांना गावातील गुत्तेदारी करणाऱ्या लोकांचा बेकायदेशीर कामे करू द्या म्हणून माझ्यावर दबाव टाकला जात आहे, ग्रामपंचायत मधील कामात यांचा भ्रष्टाचार ही जास्त आहे, यांच्या कामाला माझा विरोध असल्यामुळे यांचा माझ्यावर रोष आहे.

 या बेकायदेशीर कामात ग्रामपंचायत चे अधिकारी व पदाधिकारी यांचे ही हातमिळवणी आहे. या बेकायदेशीर कामाला माझा विरोध असल्याने मला जाणून बुजून ग्रामपंचायतिच्या कामकाजातून वगळले जात आहे.

 तसेच यांनी घेतलेल्या निर्णयावर सह्या कराव्या लागतील माझ्यावर दडपण आणलं जात आहे, तसेच माझ्या मुलावर व पतीच्या अंगावर यांनी गुंडांना लावून माझ्या व कुटंबाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या असल्या राजकारणामुळे माझ्या कुटुंबाचे दैनंदिन जीवन अडचणीत आले आहे, आशा परस्तिथी त बेकायदेशीर गुत्तेदारापुढे मी व माझे कुटुंब हतबल झाले आहे, त्यांना जर विरोध केला तर आमचे गावात जगणे व राहणे अवघड होईल.या सर्व प्रकार ग्रां. पं. सदस्य सौ.सुमन विनायक कवडे यांनी मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती कळंब यांच्याकडे देउन आपल्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

 
Top