तुळजापूर / प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह परिसरात रविवार दि.२८रोजी होळीचउत्सव कोरोना मुळे पुकारलेल्या   जनता कर्फ्यु मुळे  पारंपरिक पध्दतीने साधेपणाने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

येथील श्रीतुळजाभवानी मंदीरातील होमकुंडा समोरील होळी श्रीतुळजाभवानी मातेची नित्योपचार पुजा झाल्यानंतर देविचे मंहत व पाळीवाला पुजारीच्या हस्ते आरती करुन प्रज्वलित करण्यात आली. नंतर शहरातील चौकाचौकातील घरांन समोरील होळी प्रज्वलित करण्यात आली.

तिर्थक्षेञ तुळजापूर येथील मुख्य अशी असणारी शुक्रवार पेठ मधील,होळीवरची होळी दशावतार मठाचे मठाधिपती मंहत मावजीनाथ बाबा यांच्या हस्ते पुरणपोळीचा नैवध,दाखवून आरती करुन प्रज्वलित करण्यात आली

 
Top