बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया

कृषी सहाय्यक


बेंबळी - उस्मानाबाद तालुक्यातील रुईभर येथील महिला कृषी सहाय्यकाला तुषार सिंचनाचे अनुदान मंजूर करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या संदर्भात बेंबळी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


एका शेतकऱ्याने पोखरा (नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ) अंतर्गत तुषार सिंचन मिळण्यासाठी  ऑनलाईन अर्ज दाखल केला होता .  कामाची पाहणी करून तुषार सिंचन अनुदानाचे मागणीपत्र घेऊन सिंचन सेट खरेदी केलेचा अहवाल शासनास पाठवणेसाठी रुईभर येथील कृषी सहाय्यक रंजना नवनाथ मुंडे, ( 37)  यांनी शेतकऱ्याकडे एक हजार रुपये लाच रकमेची  मागणी केली. यातील ५०० रुपये लाच रक्कम पंचासमक्ष  स्वीकारली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. याबाबत  बेंबळी पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. श्री.राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, औरंगाबाद  

प्रशांत संपते, पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वी उस्मानाबाद यांचे  मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे (पोलीस निरीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग),  याकामी त्यांना पोलीस अंमलदार इफ्तेकर शेख , मधुकर जाधव , अर्जुन मारकड, विष्णू बेळे, विशाल डोके , चालक इरफान पठाण यांनी मदत केली.

कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.९५२७९४३१००) 

गौरीशंकर पाबळे, पो. नि, ला. प्र. वी. उस्मानाबाद यांनी केले आहे.(मो.क्र. 8888813720

 
Top