उस्मानाबाद/ प्रतिनिधी

शनिवारी सकाळी ६ वाजता घाटंग्री शिवारात मृत पावलेल्या बिबट्यावर वन विभागाच्या हातलाई रोपवाटीके मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती वन अधिकारी अमोल घोडके यंानी दिली. तर प्राथमिक अंदाजानुसार बिबट्याचा मृत्यू उपासमारी ने झाल्याची माहिती जिल्हा पश ुचिकित्सारूग्णांलयातील  डा. सुदर्शन मुंडे यंनी देऊन बिबट्याचा पीए करताना व्हिसारा औरंगाबाद येथील फॉरेन्सींक लॅब मध्ये पाठविण्यात आला आहे. तेथून ८ दिवसात आहवाल येईल त्यानंतरच बिबट्याला कोणता रोग होता का ? बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समोर येईल, असे सांगितले.  

 उस्मानाबाद तालुक्यातील घाटंग्री शिवारात शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास बिबट्या आढळून आला परंतु काही वेळातच बिबट्या बेशुध्द होऊन मृत्यू पावला. या भागात प्रथमच बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. घटनास्थळी वन अधिकारी घोडके यांच्यासह पथक दाखल झाले.

उस्मानाबाद शहरापासून आठ किलोमीटरवर अंतरावर असलेला घाटंग्री शिवार डोंगराळ भाग असून,या भागात तसेच धाराशिव लेणी,हातलादेवी परिसरात जंगल आहे. मात्र या भागात याआधी कधीही बिबट्या आढळला नव्हता किंवा बिबट्याची चर्चाही नव्हती. शनिवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान शिवारात बिबट्याने डरकाळी फोडली,त्यानंतर नागरिकांचे त्याच्याकडे लक्ष गेले.एका झाडाखाली बसलेला हा बिबट्या काही वेळातच बेशुद्ध झाला.कुत्र्यांनी त्याला चावा घेण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर नागरिकांची गर्दी वाढत गेली.पोलीस पाटील परशराम यादव व नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पथक दाखल झाले. पथकाने पंचनामा केला असून,उस्मानाबाद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदन करण्यात आले. वन अधिकारी अमोल घोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार उस्मानाबाद जिल्हयात बिबट्याचा वावर नाही, हा बिबट्या सोलापूर जिल्हयातील  बार्शी, करमाळा भागातून आल्याचा अंदाजा आहे. त्या भागात मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र असल्यामुळे व सध्या ऊसाची कटाई चालु झाल्याने बिबट्याचे लपण्याचे िठकाण नसल्यामुळे ते आपल्या भागात भटकत आल्याचे सांगितले. या बिबट्याचे वय आडीच ते तीन वर्ष असल्याने त्यांना शिकार करण्याची सवय नसल्याने उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाजा आहे. डा. सुदर्शन मुंडे यांनी सांगितले की, बिबट्याचा पीएम केल्यानंतर त्याच्या पोटात कसल्याचे प्रकारचे अन्न सापडून आले नाही, असे त्यांनी आमच्या प्रतिनिधी से बोलताना सांगितले. 

 
Top