तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी येथील अंगणवाडी क्रमांक 502 या इमारतीच्या  स्लॅबचा गिलावा शुक्रवार दि.26 मार्च रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. कोरोनामुळे अंगणवाड्या बंद असल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जाते 

सदरील अंगणवाडी बांधकामास एक वर्ष झाले आहे तरी स्लॅब कोसळल्याने  या अंगनवाडी कामाची   चौकशी   करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अंगणवाडीचे काम दर्जदार झाले नसल्याचा पार्श्वभूमीवर ताब्यात घेण्यास  विरोध होता तरीही संबंधित लोकप्रतिनिधी व सदरील ठेका याच आँफीसच्या अधिकाऱ्याचा नातलगास दिला गेल्याने यांनी दबाब टाकुन ताब्यात दिल्याचे समजते,

गोंधळवाडी येथील अंगणवाडीत एकूण 70 विद्यार्थी ज्ञानार्जन करत असून शुन्य ते 3 वर्षापर्यंतचे विद्यार्थी घरी असून 3 ते 6 वर्षे वयोगटाचे 38 विद्यार्थी आहेत. सध्या कोरोन महामारीमुळे राज्यातील सर्व अंगणवाड्या बंद असून अंगणवाडीतील सर्व लाभार्थ्यांना घरपोच आहार दिला जात आहे. त्यानुसार गोंधळवाडी येथील अंगणवाडी क्रमांक 502 मध्ये शुक्रवारी विद्यार्थ्यांचा आहार वाटप केला जात असताना स्लॅबचा गिलावा अचानक कोसळला. यावेळी पाल्याचा आहार घेण्यासाठी आलेल्या व वाटप करणाऱ्या  थोडक्यात बचावल्या. या दुर्घटनेची तत्काळ दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अंगणवाडीचे निकृष्ठ बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर व संबंधित  अधिकारी वर्गावर  तत्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी

 
Top