परंडा / प्रतिनिधी : -

परंडा तालुक्यातील शेळगांव येथील महावितरण विद्युत कंपनीचे सहाय्यक अभियंता एस.एम.राजपुत यांना चिंचपुर (बु ) येथील ग्रामस्थांनी शेतीपंप विजपुरवठा पुर्ण दाबाने मिळण्यासाठी सरपंच प्रियंका शिंदे यांच्या मार्फत निवदेन देण्यात आले.

सविस्तर माहिती अशी की, सध्या उन्हाळा दिवस सुरू झाला असुन पिकांना पाणी वेळेवर मिळणे गरजेचे आहे पण पाणी भरपुर असुन देखील केवळ विजपुरवठा पुर्ण दाबाने होत नसल्यामुळे व रोजीची रोज विज पुरवठा होत नाही त्यामुळे पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अशक्य झाले आहे.तसेच पिके पाणी असुन सुद्धा वीज पुर्ण दाबाने व वेळेवर न मिळल्यामुळे पिके करपु लागले आहेत.जर आमची पिके करपुन खाक झाल्यास ह्या नुकसानीस पुर्णपणे महावितरण जबाबदार असेल तसेच शेतकऱ्यांवर असणारे कोरोना महामारीचे सकंट तसेच शेतकऱ्यांना हक्काचा पिकविमा मिळाला नाही.तरी पण व्याजवारी, उसनवारी करून जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी महाविद्युत कंपनीच्या नियमाप्रमाणे विज बील भरले आहे.तरी देखील पुर्ण दाबाने विजपुरवठा होत नाही.तरी संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची पिके जळण्या अगोदर विजपुरवठा सुरळीत करुन शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे सरपंच प्रियंका शिंदे यांनी दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.

यावेळी ग्रा.प.सदस्य आकाश देवकर, पंडीत देवकर,चंद्रकांत भिल्लारे, शिंगाडे सर, सागर भिल्लारे, बापु भिल्लारे, हरी भिल्लारे, हनुमंत नरके, आदिकराव नरके, गोरख भिल्लारे, बाळु भिल्लारे,पप्पु मोहिते, तुकाराम नरके आदीसह चिंचपुर (बु ) व पांढरेवाडीचे शेतकरी उपस्थित होते.

 
Top