उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे ३०९  व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. या तपासणीत ९ जणांना कोरोना विषाणूंची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.

दि- १५ ते १८ मार्च दरम्यान रॅपिड अँटिजेन  तपासणी २६४ जणांची करण्यात आली. यापैकी ९ जण पॉझिटिव व २५५ जण निगेटीव्ह असल्याचा अहवाल आला आहे.  तर ४४ जणांची आरटीपीसीआरद्वारे स्वॅबची तपासणी करण्यात आली असून तपासणी केलेल्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.


 
Top