उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

येथील व्यवसायकर कार्यालय येथे नावनोंदणीकृत (Enrolled),नोंदणीकृत (Register) असलेल्या व्यक्ती आणि मालक यांनी आपला व्यवसायकर 31 मार्च-2021 पूर्वी करभरणा करणे अनिवार्य आहे.सर्व नाव नावनोंदित (Enrolled) व नोदणीकृत (Register) व्यक्ती आणि मालक यांनी कर भरणा विहित मुदतीत करुन शासनाच्या महसुल वाढीस सहकार्य करावे.तसेच अनोदित व्यक्ती व मालक यांनी त्वरित नोंदणी दाखला घेवून व्यवसायकराचा भरणा करावा,असे आवाहन व्यवसायकर अधिकारी रामचंद्र इंगळे यांनी केले आहे.

 विहित मुदतीत करभरणा न केल्यास महाराष्ट्र व्यवसायकर कायदा 1975 अन्वये  या कायदयानुसार कर, व्याज,शास्ती किंवा शुल्क यासह रक्कम वसूल करण्याची कारवाई करण्यात येईल याची सर्व नावनोंदित (Enrolled) व नोंदणीकृत (Register) व्यक्ती व मालक यांनी नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी व्यवसायकर कार्यालयाशी पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.संपर्क वस्तू व सेवा कर भवन,व्यवसायकर विभाग दूरध्वनी क्रमांक 02472-219895.www.mahagst.gov.in येथे संपर्क साधावा.

 
Top