कळंब / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोणाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात चहा, हॉटेल्स बंदचे आदेश दिलेले आहे.मात्र चहा हॉटेल्स चालक हे छोटे व्यावसायिक असून त्यांचे हातावर पोट असल्याने त्यांना आपापली दुकाने नियमाप्रमाणे उघडे ठेवण्यास सवलत द्यावी अशी मागणी कळंब शहर हॉटेल चालक मालक संघटना कळंब यांनी उपविभागीय अधिकारी यांना आपली मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

  कळंब शहरात हॉटेल व्यवसायामध्ये शेकडोच्या संख्येने कामगार काम करतात, नाष्टा बनवण्यापासून ते वेटर पर्यंत अनेकांचे कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहे.माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या आदेशानंतर या व्यावसायिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 कोरोणामुळे सद्या व्यवसाय हा नुकसानीत सुरू आहे.बहुतांश तर छोटे व्यावसायिक हे कर्जबाजारी झाले आहे, लॉक् डाऊन च्या काळातील गाळे भाडे , वीजबिल सुध्दा माफ झाले नाही, हॉटेल व्यावसायिकांना या काळात शासनाने कुठलेही मदत दिली नाही यामुळे हॉटेल व्यवसायिक चिंतेत आहेत. कोरोना च्या भीतीमुळे नागरिक बाहरचे खाणे - पिने टाळत आहेत, यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे, यातच जिल्हाधिकारी साहेबांनी काढलेल्या आदेशा मुळे व्यावसायिक अडचणीत आलेला आहे, व्यावसायिकांनी निवेदनात ज्या प्रकारे इतर व्यावसायिकांना ५०% सुट देऊन व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे त्याप्रमाणे आम्हाला पण परवानगी देण्यात यावी, आम्ही पण शासनाच्या नियमाचे  पालन करून आमचा व्यवसाय करू आशी विनंती करून परवानगी देण्याची विनंती  कळंब शहर हॉटेल चालक मालक संघटना कळंब यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.


 
Top