तुळजापुर / प्रतिनिधी- 

महाराष्ट्राचे लोकप्रिय गृहमंत्री स्वर्गीय आर आर(आबा) पाटील यांच्या धर्मपत्नी तथा तासगाव/ कवठेमहांकाळ मतदार संघाच्या  आमदार श्रीमती सुमनताई आर आर पाटील  यानी दि.25 गुरुवार रोजी श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची आपल्या कुंटुबा सोबत यथा सांग पुजा करुन घेतले मनोभावे घेतले.

 श्री तुळजाभवानी दर्शन या वेळी त्यांचे पारंपारिक  पुजारी कुमार नाईकवाडी यांनी पाटील परिवाराची यथा सांग पुजा करुन पाटील परिवारास आशीर्वाद दिला या वेळी तासगाव, कवठे मंहाकाळ मतदार संघाचे युवा नेते तथा आबाचे चिरंजीव रोहीत पाटील आबाचे धाकटे भाऊ सुरेश पाटील त्यांच्या पत्नी त्यांचा मुलगा रोहन पाटील मुलगी आदीची उपस्थिती होती.दर्शन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने,व तालुका पञकार संघाच्या वतीने आर आर (आबा) पाटील परिवारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 या वेळी उस्मानाबाद जिल्हा पञकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम पञकार संजय खुरुद,पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे रा.काँ. चे शहराध्यक्ष अमर चोपदार रा.काँ.चे युवक चे तालुका कार्याध्यक्ष शरद जगदाळे रा.काँ.चे बाळासाहेब चिखलकर गणेश नन्नवरे आदीसह रा.काँ.कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top