तुळजापुर / प्रतिनिधी- 

तुळजापूर तालुक्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत असून गेल्या दोन वर्षात 84 प्रकरणे मा. न्यायालय तुळजापूर येथे दाखल झालेली आहेत. जानेवारी 2019 ते मार्च 2020 या कालावधीत 84 प्रकरणे  तालुक्यात दाखल झाली तसेच डिसेंबर 2020अखेर तुळजापूर येथे 57 प्रलंबित प्रकरणे आहेत . 

दिनेश घुगे , महिला संरक्षण अधिकारी ,अभय केंद्र, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तुळजापूर यांनी ही माहिती दिली.महिलांवर वाढते अन्याय-अत्याचार व कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात वरचेवर वाढ होत चालल्याचे दिसून येत आहे .चारित्र्यावर संशय ,दारू पिऊन मारहाण ,माहेरहून गाडी- प्लॉट खरेदी साठी पैशाची मागणी, लग्नात मानपान केला नाही म्हणून मारहाण आदि कारणाने कौटुंबिक हिंसेत वाढ दिसून येत आहे.  देशात महिलांच्या परिस्थितीत सुधारणा होताना दिसून येत नाही महिलांवर होणारे अत्याचार रोखायचे असतील तर महिला ने स्वतःहून कायद्याचा आधार घेतला पाहिजे असे मत दिनेश घुगे महिला संरक्षण अधिकारी तुळजापूर यांनी नोंदविले.

 
Top