तेर/ प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील थोडसरवाडी येथे जनावरासाठी वंधत्व निवारण शिबिर संपन्न झाले.  बायफ डी .आय. एम .एल. डी .व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने व पशु  संवर्धन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संपन्न झाले.

या शिबिरामध्ये 119 गाई व म्हशीचे तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये सर्व पशूंना मोफत उपचार देण्यात आले. याप्रसंगी पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय कुमार लोंढे यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केले. दुग्ध व्यवस्थापनामार्फत स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना प्रकल्प या योजनेतून पशुपालकांना कोणते लाभ मिळणार आहेत या विषयावर क्षेत्रीय प्रकल्प अधिकारी बायफ चे अतुल मुळे यांनी मार्गदर्शन केले.


 
Top