तेर / प्रतिनिधी

तेर (ता.उस्मानाबाद)  येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी मज्जित मनियार यांची निवड बिनविरोध निवड करण्यात आली.

  तत्कालीन उपसरपंच  बाळासाहेब कदम यांना पक्षश्रेष्ठी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानंतर कदम यांनी राजीनामा दिला. आ.पाटील यांचे समर्थक ग्रामपंचायत सदस्य  15 असून त्यामध्ये 7 पुरुष  व  8 महिला सदस्यां आहेत. तर विरोधी गटाचे  दोन सदस्य निवडून आलेले  आहेत. त्यामुळे  आ.राणाजगजितसिंह पाटील सांगतील तोच उपसरपंच पदावर विराजमान होणार होते.26 मार्चला उपसरपंच पदासाठी निवडणूक होती.आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी मज्जित मनियार यांचे नाव बंद लिफापाद्वारे पाठविलें होतें.मनियार यांचा एकच अर्ज असल्याने मनियार यांची बिनविरोध निवड झाली.  

तेर महसूल मंडळ विभागाचे मंडळ आधिकारी  अनिल   तिर्थकर यांची अध्यासी आधिकारी म्हणून  काम पाहिले.त्यांना तलाठी श्रीधर माळी, ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी यांनी सहकार्य केले.मज्जित मनियार यांची तेरच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंहजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी  आ. राणाजगजितसिंह पाटील ,तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी उपस्थित होते.

 
Top