उस्मानाबाद / प्रतिनिधी:

 कोरोनाचे संकट त्यातच जिल्हा प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत असलेल्या आवाहनामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. रोजगारासाठी अनेकजण भटकंती करीत आहेत. त्यातच त्यांनी केलेला रोजगार पदरी पाडून घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागत असतानाच बँकांची सलग चार दिवस सुट्टी आल्यामुळे काहीजण पैसे माझ्याकडे आहेत. परंतू बँकेला सुट्टी असल्यामुळे थोडे थांबा, अशी थाप मारून त्यांना झुलविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

वर्षभरापासून लोक डाऊन असल्यामुळे अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. त्यामुळे दररोज काम केल्याशिवाय त्यांचा संसाराचा गाडा चालू शकत नाही. मागील महिन्यापासून संसाराचा गाडा हळूहळू रुळावर येत असतानाच पुन्हा जनता कर्फ्यूचे भूत जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्यांच्या मानगुटीवर बसविले असल्यामुळे त्यांची जगण्यासाठीची सुरू असलेली धडपड मंदावली आहे. केलेल्या मजुरीचा मोबदला घेण्यासाठी ते संबंधितांकडे हात पसरतात. परंतू बँक बंद असल्याचे कारण सांगत असल्यामुळे त्यांची निराशा होत आहे. बँकांना शनिवार रविवार या दोन सुट्ट्यासह   सोमवार दि.१५ आणि उद्या मंगळवार १६ रोजी  खाजगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने दोन दिवस बॅका बंद राहणारआहेत. त्यामुळे बँकेचे व्यवहार ठप्प झाल्याने अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे व लागणार आहे.

 
Top