उस्मानाबाद/ प्रतिनिधी

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिल्हा निवड चाचणी स्पर्धेमध्ये हातलाई कुस्ती संकुलाच्या यशस्वी झालेल्या पैलवानांचा सन्मान कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष अभिराम पाटील व मनोज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

दत्ता (बबलू) धनके, श्रीकांत शेगर, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, ज्ञानेश्वर हरवले, स्वप्नील पौष्टिक, विजय गायले, सागर कुंभार, विकास चोपडे, सूरज गवळी, राहुल शेळके, सौरव कडवकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस अधिकारी रामेश्वर मुसळे, काका सूर्यवंशी, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


 
Top