वाशी/ प्रतिनिधी

कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे  जागतिक महिला दिन महाविद्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुजाता हंकारे (नायब तहसीलदार वाशी) व सौ.सावित्री जाधव हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र कठारे हे होते. प्रा.सुनिता डोके, प्रा.अनिता चिंचोलकर, सौ.वैदही गंभीरे प्रा.छाया नखाते, प्रा.उर्मिला कवडे, सौ.अनिता उंदरे, सौ. माया आवारे, प्रा.आर.आर जाधव, प्रा.डॉ.अरुण गंभीरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुजाता हंकारे यांनी सांगितले कि,   ०८ मार्च रोजी जागतिक महिला दिन. स्त्रियांवर होत असलेले अत्याचार, अन्याय दूर व्हावे, सर्वच क्षेत्रात महिलांचा विकास व्हावा यासाठी  जगभर  साजरा केला जातो.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र कठारे  व   प्रा.सुनिता डोके, सौ.वैदही गंभीरे, कु. पूनम सावंत, कु. निलोफर मुजावर यांनीही आपले मत मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनिता चिंचोलकर यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. डॉ. दैवशाला रसाळ, तर आभार प्रा.शालन जगताप यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top