लोहारा/प्रतिनिधी

पंचायत समिती लोहारा अंतर्गत लोहारा तालुक्यातील कास्ती खु येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थीचा गृह प्रवेश सोहळा पार पडला. 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लाभार्थी रावसाहेब अप्पा भुजबळ यांची सुन रूक्मिणीबाई भुजबळ यांना वृक्ष देवुन सत्कार करून गृह प्रवेश करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी सोपान अकेले, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढाकणे, सरपंच सागर पाटील, ग्रामसेवक बापु जट्टे, पं.स.अभियंता परवेज सय्यद, संदीप पसारे, आदि उपस्थित होते.


 
Top