उस्मानाबाद / प्रतिनिधी

 कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दि.8 मार्च रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस टोचून घेतली.

 यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, डॉ.कुंभार, काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, राजेंद्र उर्फ मुन्ना इंगळे, पीए जाधव व रुग्णालयातील डॉक्टर व परिचारीका आदींची यावेळी उपस्थिती होती.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत असून कोरोनाला हरवण्यासाठी वेळीच् लस घेण्याचे आवाहन करीत काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी स्वतः लस घेऊन इतरांनीही कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी वेळीच लस घेण्याचे आवाहन त्यांनी जिल्हावासियांना केले आहे. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक धनंजय पाटील यांच्या हस्ते काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात आले. 

 
Top