तेर / प्रतिनिधी - 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे शिवजयंतीनिमित्त ग्रामसेवा संघाच्या वतीने धावणे व स्लो सायकलींग या मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धैतील विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.

यामध्ये धावणे या स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवी या मुलींच्या गटात प्रथम पूजा पिंपळे ,द्वितीय आरती कोळेकर, तृतीय प्राजक्ता जाधव व इयत्ता आठवी ते दहावी मुलींच्या गटांमध्ये प्रथम प्रणिता जाधवर ,द्वितीय गीता गोरे, तृतीय राजनंदिनी कानडे आणि मुलांच्या पाचवी ते सातवी गटामध्ये प्रथम सौरभ लोमटे ,द्वितीय सार्थक ढगे, तृतीय पृथ्वीराज चव्हाण तर आठवी ते दहावी मुलांच्या गटामध्ये प्रथम ओमकार गाढवे, द्वितीय शिवप्रकाश रोडगे, तृतीया मोईन शेख, विजेते ठरले तसेच स्लो सायकलींग या स्पर्धेतील इयत्ता पाचवी ते सातवी गटात प्रथम सौरभ लोमटे, द्वितीय प्रसाद नाईकवाडी, तृतीय संस्कृती ढगे इयत्ता आठवी ते दहावी गटात प्रथम ओमकार वाकोरे, द्वितीय अमानत मुलानी ,तृतीया रोहन घोडके विजेते ठरले.या विजेत्यांना डॉ.बालाजी खराडे,अरुण नाईकवाडी, गोविंद  कोळेकर, गणेश नाईकवाडी. , विलास टेळे, हनुमंत हेगडकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.  यावेळी नवनाथ पांचाळ , ,गोपाळ थोडसरे , ॲड. बालाजी भक्ते ,तानाजी पिंपळे,केशव सलगर,, रितेश चव्हाण,विजय थोडसरे  ,हरी खोटे ,नरहरी बडवे,बापू नाईकवाडी , गोरोबा माळी उपस्थित होते,

 
Top