उस्मानाबाद /  प्रतिनिधी- 

पालकमंत्री शंकरराव गडाख  यांनी शेतकऱ्यांवर केला अन्याय केला तसेच मुळा कारखाऱ्यांवर कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी भाजपाच्या वतीने जिलाधिकारी मार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाहीतर पालकमंत्री गडाख यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे. 

 उस्मानाबाद भारतीय जनता पार्टी  तर्फे  निवेदनात म्हटले आहे की,  दि. 19/02/2021 रोजी नेवासा तालुक्यातील करजगांव येथे शेतकऱ्यांनी मुळा सहकारी साखर कारखान्याने ऊसाला तोड दिली नाही म्हणून 2.5 एकर ऊस पेटवून दिला होता. 4 मार्च 2021 रोजी आणखी  एका सोनई  येथील शेतकऱ्यांनी देखील मुळा कारखान्याने ऊस तोड न दिल्याने ऊस पेटवून दिला आहे. विधानसभा निवडणूकीत जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांच्या विरोधात काम केल्यामुळे कारखान्याने सदर शेतकज्यांचा ऊस नेहलेला नाही. हा त्या शेतकऱ्यांवर अन्याय आहे. घाम गाळून कष्ट करुन शेतकज्यांना हाती आलेले पीक पेटवून देताना काय वेदना होत असतील याचा विचार आपण करावा. शंकरराव गडाख हे राज्याचे कॅबीनेट मंत्री आहेत. त्यांनी मंत्री पदाची शपथ घेताना घेतलेल्या शपथेचा हा भंग आहे.  असे शेतकरी विरोधी मंत्री मंत्रीमंडळात असने राज्याच्या हिताच्या विरोधात आहे. त्यामुळे सदरील अन्यायाची तातडीने चौकशी करुन मुळा कारखान्यावर कार्यवाही  करावी व  शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी पालकमंत्री ना. शंकरराव गडाख यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल. 

निवेदनावर भाजपा जिलाध्यक्ष अनिल काळे, अॅड.िनतीन भोसले, राजिसंह राजेनिंबाळकर, सूरज शेरकर, विनोंद निंबाळकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top