परंडा / प्रतिनिधी :- 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयांमध्ये आय क्यु ए सी  विभागाच्या वतीने महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. 

 यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ.दीपा सावळे ,आई क्यू ए सी चे समन्वयक प्रा.दीपक तोडकरी, प्रा विद्याधर नलवडे ,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे ,कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.संजीवन गायकवाड ,कनिष्ठ विभागाचे सांस्कृतिक प्रमुख प्रा.संभाजी धनवे आदी उपस्थित होते. 

 यावेळी महाविद्यालयास नॅकचा ए ग्रेड प्राप्त झाला आणि या यशस्वीते मध्ये सांस्कृतिक विभागाचाही सिंहाचा वाटा असल्याने संस्थेच्या वतीने सर्व महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला ,  परंतु या यशामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असल्याने त्यामध्ये सांस्कृतिक विभागाचा मोठा वाटा असल्याने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी विद्यार्थ्यांचाही सन्मान व्हावा या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यामध्ये नॅक समिती समोर अनेक विद्यार्थ्यांनी आपले विविध गुणदर्शन सादर केले होते.त्यामुळे या समितीने त्यांचे विशेष कौतुक केले.ग्रामीण भागामध्ये अनेक विद्यार्थी कलागुणांनी तरबेज असतात केवळ त्यांना कोणतीही दिशा नसताना ते आपल्या कलेने ओळखले जातात .परंतु शहरातील एकमेव महाविद्यालय आहे.

 या महाविद्यालयाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या युवक महोत्सवामध्ये अनेक वेळा पारितोषिक पटकाविले आहेत म्हणून या महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग महाविद्यालयाच्या विकासामध्ये भर घालत आहे.केवळ यामुळेच या विभागाचा सन्मान होत आहे.महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग यापुढे आणखी जोमाने काम करेल व महाविद्यालयाची ओळख निर्माण करेल यासाठी त्यांना जी आवश्यक गोष्टी हव्या आहेत त्या पूर्ण मिळतील असे आश्वासन यावेळी अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी दिले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विद्याधर नलवडे यांनी केले, प्रास्ताविक प्रा.दीपक तोडकरी यांनी केले.प्रा. संजीवन गायकवाड ,प्रा संभाजी धनवे यांच्यासह संदेश शिंदे, तृप्ती करळे, भाग्यवान रोडगे या विद्यार्थ्यानी  आपली मनोगत व्यक्त केली.तर कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी मानले .

 
Top