कळंब ( शिवप्रसाद बियाणी

कळंब रोडवर मंगरूळ पाटी येथे नवजीवन गो शाळा स्थापन करून गो माता रक्षणाचे काम करणाऱ्या वैशाली गायकवाड यांनी पन्नास  पेक्षा जास्त भाकड जणावरे सांभाळत त्यापासुन मिळणारे शेन , गोमुत्र यापासुन सेंद्रीय आयुर्वेदीक व गो उत्पादने घरच्या घरीच तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला  आहे.

 या ठिकाणी च गांडूळ खत निर्मितीही सुरू केली यात त्यांना त्यांच्या कुटुंबीयांचीही चांगली साथ मिळाली . घरी बसल्या बसल्या शेणापासुन दिवे , धुप , आयुर्वेदीक साबन , अमृत धारा , गो नाईन , पेन रिलीफ बाम , गोमुत्र अर्क , पारिजातक अर्क , तुलसी अर्क , गोवर्या ,सर्व प्रकारच्या पुजेचे साहित्य , आयुर्वेदिक साहित्य , केमिकल विरहीत ( सेंद्रीय ) धान्य ,हॅडमेड तर मिशनवर अकर्षक मात्र शेणापासुनचे दिवे तयार करण्याचा उद्योग सुरू केला आहे .शेतकरी यांनी भाकड जनावरे व्यापाऱ्यां ना न विकता ते गो शाळेत आणून सोडावीत असे आवाहन ही वैशालीताई गायकवाड यांनी केले आहे.

 यापूढे केमीकल विरहित फळे ,भाजीपाला उत्पादन करण्याचा मानस आहे. नागरीकांना या वस्तु व स्वस्तात मिळाव्या यासाठी नवजीवण सेंद्रीय आयुर्वेदीक व गो उत्पादने म्हणुन दुकान कळंब शहरात ढोकी रोड एल.आय. सी.सी.च्या समोरील बाजू वरचा मजला गाळा क्र.२ (मो.8805696221) येथे सुरू केले आहे . उत्पादनाला चांगला प्रतीसाद मिळाल्यास प्रत्येक शहरात ही उत्पादने पोहचवण्याचा मानस आहे . गो रक्षणासोबत आर्थार्जनाचा मार्ग वैशाली गायकवाड यांनी  स्विकारून इतर महिलांना प्रेरणा मिळेल असे कार्य सुरू केले आहे .

 
Top