कळंब / प्रतिनिधी- 

सवित्रीमाईंनी पहिली मुलींची शाळा काढल्यामुळेच आम्ही शिक्षण घेवू शकलो म्हणूनच जागतिक महिला दिनी सवित्रींच्या लेकींचा सन्मान म्हणून प्रबुद्ध रंगभूमीने आम्हाला समाजरत्न पुरस्कार दिला असल्याचे प्रतिपादन प्रा.मिनाक्षी शिंदे यांनी केले.

पिंपळगाव(डोळा) येथील संतयोगी साधुबुवा महाराज मंदिर परिसरात प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था कळंब च्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस सावित्रींच्या लेकींचा सन्मान सोहळा कार्यक्रम अँड.शकुतंला फाटक-सावळे यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाला . 

 या कार्यक्रमात पिंपळगाव (डोळा) येथील सामाजिक,आर्थिक,राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना समाजरत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा.मिनाक्षी शिंदे-भवर यांनी सावित्रीबाईचे कार्य आणि जागतिक महिला दिनाचे महत्त्व विषद केले. प्राजक्ता पाटील यांनी अंधश्रध्देत जखडलेल्या महिलांना मासिक पाळी,कुंकू लावणे, सौ.किंवा श्रीमती लावणे,शिक्षणात व घरकामात मुला-मुली मध्ये भेद करणे हे उदाहरणे देवून पटवून सांगितले तर प्रास्ताविकातून संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके यांनी संत योगी साधू बुवा महारांजाचे कार्य,गौतम बुध्दांनी पाच बाह्य ज्ञानेंद्रियाचे कार्य,मरण,आणि सजीवांचे देह चार तत्वात कसे आधारलेले आहेत या बाबतचे सिध्दांत,जागतिक महिला दिनाचे महत्त्व आणि सवित्रीमाईंच्या कार्याचा आढावा घेत सावित्रीच्या लेकीचा सन्मान सोहळा आयोजनाचा हेतू सांगितला. 


 
Top