लोहारा/प्रतिनिधी 

महात्मा फुले युवा मंच लोहारा व महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने शहरातील माळी काँम्पलेक्स येथे दि.10 मार्च 2021 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 124 वा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. 

यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी व माजी पं.स.सदस्य दिपक रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, सुग्रीव क्षिरसागर, नगरसेवक श्रीनिवास माळी, प्रा.डि.एन.कोटरंगे, समता परिषदेचे शहराध्यक्ष अमोल माळी, राजेंद्र क्षिरसागर, राम क्षिरसागर, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे तालुका अध्यक्ष सोमनाथ माळी, शिवमुर्ती मुळे, अशोक काटे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, तानाजी घोडके, प्रकाश कांबळे, किसन काटे, संतोष क्षिरसागर, आरुण वाघमारे, विष्णु क्षिरसागर, अशोक क्षिरसागर आदी उपस्थित होते.

 
Top