लोहारा/प्रतिनिधी

बालकांचा शिक्षणाचा हक्क अधिनिय 2009 अंतर्गत लोहारा तालुक्यातील सर्व गाव, वाडीवस्त्या, तांडा, कारखाना परीसर, विटभट्ट्या आदी ठिकाणी राज्यस्तरावरून शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम राबवण्यात येत आहे.

 यामध्ये तीन प्रपत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 3 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांची माहीती घेऊन संकलीत केली जात आहे. यामध्ये गावस्तरावर समिती गठीत करून सर्वांच्या मदतीने काम पाहीले जात आहे. प्रगणक म्हणुन लोहारा तालुक्यातील शाळेतील शिक्षक, शिक्षिका काम पाहत आहेत. सर्व घटकातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये असा शासनाचा उद्देश आहे असे गटशिक्षणाधिकारी श्रीमती टी.एच.सय्यदा  लोहारा यांनी सांगितले. 

या मोहीमेत 10 मार्चपर्यंत सर्वे करावयाचा असुन त्यानंतर प्रपत्र अ माहीतीच्या अधारे शाळाबाह्य विद्यार्थी सापडल्यास प्रपत्र ब मध्ये संकलन तालुकास्तरावर केले जाणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थी निदर्शनास आल्यास त्याला जवळच्या शाळेत वयानुसार प्रवेश देण्यास येणार असल्याची माहीती लोहारा येथील प्रगणक वर्षा चौधरी, महानंदा राठोड, सोनल कांबळे यांनी दिली. सदरील सर्वेक्षण गटशिक्षणाधिकारी श्रीमती टी. एच.सय्यदा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. यामध्ये पर्यवेक्षीय यंत्रणेतील शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव, दत्तप्रसाद जंगम, श्रीमती रंजना मैंदर्गी, विषय साधनव्यक्ती अनंत लहाने, श्रीमंत काळे, हणमंत दुधभाते, रवि आगळे यांच्यासह तालुक्यातील शिक्षक, शिक्षिका सहभागी झाले आहेत.


 
Top