तुळजापूर   / प्रतिनिधी- 

येथील उपजिल्हारुग्णालयात कार्यरत असणारे  डाँ अमित शिरशीकर यांचे शनिवार दि. १९ रोजी दुपारी सोलापूर येथे रुग्णालयात उपचार चालु असताना निधन झाले.

कोरोना कालावधीत शहरातील सर्वसामान्य रुग्णांना केलेल्या आरोग्य सेवे बाबतीत केलेली मदत हे तुळजापूरकर कधीही विसरु शकणार नसल्याने कोरोना  योध्दा हरपला डाँक्टरांन मधील देवमाणुस गेला अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे 

कोरोना कालावधीत ते सदैव सर्वसमान्य रुग्णांनसाठी उपलब्ध असत उपचार करताना त्यांनी पैशाचा कधीही अट्टाहास केला नाही त्यांच्या  निधनाचे वृत्त पसरताच शहरावर शोककळा पसरली असुन शहरातील विविध सामाजिक संस्था पक्ष संघटना यांनी त्यांना फलक लावुन भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण केली. 

 
Top