उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील महिला सक्षमीकरण विभाग व राषट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ८मार्च जागतिक महिला दिन ऊत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख होते.

यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सविता भोसले म्हणाल्या की,आजच्या काळात महिलांच्यापुढे अनेक आव्हाने आसली तरी त्याला महिलांनी सामोरे जावे.आजच्या काळात एकञ कुटुंब पध्दीती आवश्यक आहे.महिलांनी कोणतीही गोष्ट सकारात्मक पध्दतीने करावी आणि आर्थिक ऊन्नती पेक्षा संस्कारातून झालेली उन्नती महत्वाची आहे.

अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,आजच्या विद्यार्थिनींनी चांगले संस्कार आत्मसात करून घ्यावेत व चांगल्या क्षेञात जाण्यासाठी प्रचंड अभ्यास करावा आणि यश मिळवावे .पुढचे आयुष्य चांगले जगायचे असेल तर आता अभ्यासाचे करण्याचे कष्ट घ्यावे.

यावेळी प्रा.डाॅ.विद्या देशमुख ,प्रा.स्वाती बैनवाड,प्रा.गावित ए,व्ही.प्रा.सौ.बाबर व्ही.के,प्रा.सौ.बोबडे व्ही.ए,प्रा.सौ.शेटे,प्रा.सौ.डोळे,प्रा.श्रीमती वाघमारे या प्राध्यापक महिला उपस्थित होत्या.सूञसंचालन स्मिता पवार यांनी केले,प्रास्ताविक प्रा.श्रीमती गोंदकर बी.व्ही.यांनी केले आभार प्रा.माधव उगिले यांनी मानले.

 
Top