उस्मानाबाद/प्रतिनिधी

आपल्याला कोरोना झालय का ? या भितीने झपाटलेल्या एका तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गांवरील तुळजाभवानी शॉपींग सेंटरच्या मागील बाजूस  भिंतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि. २ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली आहे. घटनास्थळी  उपविभागीय पुलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी तातडीने भेट देऊन पाहाणी केली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील बामणी येथील सुदर्शन सोमनाथ शिरस (२५) याच्यावर मानसिक संतोलनाबाबत डॉ.कानडे यांच्याकडे उपचार चालू होते. कांही दिवसापुर्वी पुण्याला ही जाऊन आला होता. दि. २८ मार्च रोजी त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याला सिव्हील हॉस्पीटल येथे ऑडमीट करण्यात आले होते. जेवणाचा डबा घेऊन येणाऱ्या व्यक्तीस आपल्याला कोरोना झाला तर काय खरे नाही, असे म्हणत असत.दोन दिवसापुर्वी या तरुणाने आरोग्य सेतू विभागातून आपली माहिती घेतली असून त्या माहितीचा ते दुर उपयोग करतील या भितीपोटी उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात  आरोग्य सेतू विरोधात अर्ज देण्याचा  प्रयत्न ही केला होता. सिव्हील हॉस्पीटल मध्ये ऑडमीट असताना सुदर्शन शिरस याने आपल्याला डॉ.कानडे यांच्याकडे घेऊन चला ते माझ्यावर उपचार करतील, असे सांगत होता. कोरोनाची भिती व मानसिक संतुलन ठिक नसल्यामुळे तरुणाने आत्महत्या केली  आहे.अशी माहिती उपविभागीय पुलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी दिली. या संदर्भात आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

 
Top