तुळजापूर / प्रतिनिधी- 

तुळजापूर येथून अपसिंगा -कामठा मार्गे  उस्मानाबादला जानारी बस फेरी सुरू करण्यात यावी,अशी मागणी  राष्ट्रवादी विद्यार्थी  काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी  आगारप्रमुख राजकुभार दिवटे यांच्याकडे निवेदन देवुन केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे अपसिंगा - कात्री- कामठा-  येथील उस्मानाबादल शिक्षण  घेणाऱ्या  विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन  ही फेरी चालू करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी या मागणीचा  विचार  केला जाईल,असे आश्वासन आगार .प्रमुख राजकुमार दिवटे यांनी दिले.   यावेळी  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, तालुकाध्यक्ष रोहित चव्हाण,समर्थ पैलवान  जिल्हा सरचिटणीस मयूर दराडे रणजित पलंगे उपाध्यक्ष केतन क्षिरसागर, शहराध्यक्ष आदित्य शेट्टे तसेच विद्यार्थी  उपस्थितीत  होते.

 
Top