कळंब / प्रतिनिधी : -

आजच्या युवकांनी नौकरीचया पाठीमागे न लागता उद्योग व व्यवसायाचे कौशल्य आत्मसात करून स्वतच्या पायावर उभे रहावे व महिलांनी ही आता मागे न रहाता विविध क्षेत्रात  आपली वेगळी ओळख निर्माण करावी असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी केले. ते मांगल्य एंटरप्रायजेस निर्मिती अगरबत्तीचया विविध प्रकारच्या पॅकींगचया उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कळंब चे प्रसिद्ध किराणा व्यापारी आनंद बलाई, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर मोरे, किराणा असोसिएशनचे अध्यक्ष शिवराज अप्पा होनराव, रोटरीचे सचिव डॉ सचिन पवार, प्रा संजय घुले, कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर, मांगल्य एंटरप्रायजेस च्या संचालिका पोर्णिमा मोहीते उपस्थित होते.

 पुढे बोलताना कापसे म्हणाले की पोर्णिमा  यांनी पुणे येथे उच्चशिक्षण घेऊन ही नौकरीचया पाठीमागे न लागता स्वतःचा उद्योग स्थापन करून तरूणी व तरूणांच्या पुढे आदर्श निर्माण केला आहे. प्रत्येक तरुणांनी सकारात्मक विचार केला तर आपल्याला उपजिविकेसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागणार नाही. व आजच्या तरूणांमधील उदासीनता दुरू होइल, यासाठी शिवसेना सदैव तरूणांच्या सोबत आहे असे अशवासन त्यांनी या वेळी दिले.

 या वेळी परमेश्वर पालकर, डॉ सचिन पवार, सुशील तिर्थकर ,  प्रा ढेंगळे मॅडम, वैभव उंबरे यांनी शुभेच्छा दिल्या व उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी संदीप बावीकर, शंकर माने, अशोक चोंदे, नागेश कोकीळ, माणिक  बोंदर, करसन पटेल, संजय शेंडगे, अभिजित मगर, शुभम साळुंके, निलेश कदम,  व मोहिते कुटुंबीय हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संजय घुले यांनी केले तर प्रास्ताविक व आभार पोर्णिमा मोहीते यांनी मानले.

 
Top