तुळजापूर / प्रतिनिधी : - 

 शहरातील बसस्थानकासमोरील एका लॉजवर नऊ वेश्यांसह सात पुरुष आढळून आले असून, पोलिसांनी या सगळ्यांची चौकशी सुरू केली आहे.

मंगळवारी (दि.१६) रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात कारवाईची प्रक्रिया सुरू होती. उपविभागीय अधिकारी डॉ. दिलीप टिप्परसे यांनी हा छापा टाकला. पोलिसांनी सांगितले की, गुप्त माहितीवरून तुळजापूर शहरातील एका लॉजवर मंगळवारी (दि.१६) सायंकाळी छापा टाकण्यात आला. यावेळी वेश्या व्यवसाय करणाऱ्या नऊ महिला तसेच सात पुरुष पोलिसांच्या पथकाला आढळून आले. या सगळ्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. तसेच पोलीस अधीक्षकांकडे यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर ही कारवाई केल्याचे समजते. या लॉजमध्ये हा व्यवसाय किती दिवसांपासून सुरू होता, यासंदर्भातील माहिती आता पोलीस तपासातून समोर येईल. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

 
Top