परंडा / प्रतिनिधी : - 

महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोती अभियान उमेद अंतर्गत परंडा तालुक्यातील डोंजा येथे राजमुद्रा प्रभागसंघाची स्थापना दि. १६ रोजी करण्यात आली . 

राजमुद्रा प्रभागसंघाच्या अध्यक्षपदी डोंजा येथील सविता अण्णासाहेब सुर्यवंशी , सचिवपदी भोत्रा येथील लक्ष्मी रामेश्वर शिंदे, कोषाध्यक्षपदी देऊळगांव येथील अनिता धनाजी गााढवे तर लिपिका म्हणून कोकरवाडी येथील निकिता बाळासाहेब करळे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अभियान व्यवस्थापक  माणिक सोनटक्के होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक कुचेकर होते. कार्यक्रमास परिसरातील देऊळगाव, कौडगांंव, भोत्रा, कोकरवाडी आदी गावातील ग्रामसंघाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रभागसंघ बांधणीसाठी प्रभाग समन्वयक धनंजय चांदणे, प्रेरिका वनिता घोगरे, दिपिका गणगे यांनी परिश्रम घेतले.

 
Top