उस्मानाबाद/ प्रतिनिधी

भारतीय रेल्वेच्या सोलापूर विभागीय रेल्वे प्रवासी सुविधा समितीवर योगेश केदार यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दृष्टीने हा सर्वात मोठा विभाग आहे. निवडीबद्दल केदार यांचे अभिनंदन होत आहे. त्यांनी यापूर्वीही दिल्लीमध्ये राहून सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वेसाठी प्रयत्न केले आहेत. खासदार छत्रपती संभाजी महाराजांच्या निकटवर्तीय असलेल्या योगेश केदार यांचे उस्मानाबाद तुळजापूर रेल्वेसाठी निधी मंजूर करून आणण्यात योगदान आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि सदस्यांच्या धोरणात्मक बैठका होत असतात. त्यामध्ये उपस्थित राहून धोरणात्मक निर्णयासाठी मत मांडणे, नवीन रेल्वे प्रकल्पांची मागणी करणे, रेल्वे प्रवाशांच्या सर्व सोयीच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची जबाबदारी सदस्यांची असते.

पदाला न्याय देईन-  केदार

पाच वर्षांपासून मी सोलापूर-तुळजापूर रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. अडगळीत पडलेला हा प्रकल्प संभाजीराजे छत्रपतींच्या माध्यमातून आणि अधिकाऱ्यांसोबत असलेल्या संबंधांतून मंजूर करण्यात भूमिका निभावली.काही कोटी रुपये मंजूरही झाले. प्राथमिक स्तरावर २० कोटी रुपये वर्गही झाले आहेत. या पदाचा उपयोग नक्की होईल आणि मी पदाला न्याय देईन.

 
Top