उस्मानाबाद/ प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्यावतीने उस्मानाबाद शहरासह जिल्हाभरातील थकीत असलेल्या वीज ग्राहकांचे विद्युत कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून ती तत्काळ थांबवावी. तसेच ज्यांचे कनेक्शन तोडण्यात आलेले आहे, त्यांचे कनेक्शन पूर्ववत जोडण्यात यावीत अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्याकडे दि.४ मार्च रोजी करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, शहरातील नागरिकांचे घरगुती विद्युत कनकेशन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ज्यांचे विज बिल थकीत आहे अशा ग्राहकांचे वीज कनेक्शन गेल्या दोन दिवसांपासून तोडीत असून ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत राज्य सरकारचा निर्णय होईपर्यंत  शेतकरी व घरगुती कनेक्शन तोडणे थांबवावे असे सभागृहात जाहीर केले आहे. त्यामुळे उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील विद्युत कनेकशन तोडण्याची मोहीम तात्काळ बंद करून ज्यांचे कलेक्शन तोडण्यात आलेली आहेत ती पूर्ववत जोडण्यात यावीत अशी मागणी केली आहे.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे, शहराध्यक्ष सौरभ देशमुख, उपाध्यक्ष पृथ्वीराज मुळे, प्रणव देशमुख, महेश सुरवसे, चैतन्य माने,  प्रसाद सोनवणे, अविनाश जाधव, समधान बागल, सचिन तट, गिरीश साळुंखे, विजय बापट, आशिष क्षिरसागर आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.

 
Top