कळंब/ प्रतिनिधी

 शहरा मध्ये दोन दिवसा पासून पिवळे व वास मारणारे पाणी येत असून  या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.  न.प. ने नागरिकांसाठी स्वच्छ पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

 मुख्याधिकारी  यांना  शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.कळंब करानां  न.प च्या दुर्लक्ष मुळे पिवळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागत आहे. या पूर्वी ही  काळे पाणी येत होते  मातीमिश्रीत काळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने प्राशन करावे लागले होते. तर वितरण व्यवस्थेतील दोषामुळे अनेक भागात पाणी पोहचतच नाही. सध्या दोन तीन दिवसापासून शहरा त पिवळे पाणी येत आहे.या मुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून,अगोदरच कोरोना ची भीती सर्वांच्या मनात आहे,. स्वच्छ पाण्या साठी नागरिकांची भटकंती सुरू झाली असून,तत्काळ पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. नगरपरिषदेच्या दुर्लक्षितपणाबाबत नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

  वरील विषय गांभीर्याने घेण्यात यावा यासाठी कळंब शिवसेनेच्या वतीने मा. मुख्याधिकारी  यांना   निवेदन देऊन स्वच्छ पाणी नळाला न आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा  शिवसेनेचे गटनेते तथा तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांनी दिला.

      या निवेदनावर गट नेते शिवाजी आप्पा कापसे, श्याम नाना खबाले,राजा भाऊ जंत्रे,  शहर अध्यक्ष प्रदीप मेटे,नगरसेवक सतीश टोणगे, प्रताप मोरे, संजय घुले,अजित गुरव,किरण राजपूत,विकास कदम, युवा सेना शहर अध्यक्ष गोविंद चौधरी,विठ्ठल जाधव, डॉ.रुपेश कवडे,राजा भाऊ गरड, यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top