उस्मानाबाद / प्रतिनिधी:
औरंगाबाद उच्च न्यायालय येथे दाखल न्यायालयीन प्रकरणी दि.04 जुलै-2019 रोजी दिलेल्या अंतिम निर्णयानुसार तुळजापूर येथील कृषी चिकित्सालय प्रक्षेत्रावर मजूर म्हणून काम केलेल्या मजुरांची माहिती एकत्रित करण्यात आली आहे. ही माहिती उस्मानाबाद येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतातील उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयात तसेच संबंधित प्रक्षेत्रावर डकविण्यात आली आहे. याबाबत अक्षेप असल्यास नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या माहितीबदल कुणाला काही आक्षेप असल्यास तसेच या माहितीमधील सर्व मजुरांनी त्यांच्या नावासमोरील माहिती (जसे मजुरांचे नाव,प्रक्षेत्रावर रुजू झाल्याचा दिनांक,जन्म दिनांक,वय,जात,शैक्षणिक अर्हता असल्यास प्रथम कोणत्या प्रक्षेत्रावर काम केले, सध्या काम करीत असलेले प्रक्षेत्र/मुख्यालय इ.)मध्ये काही त्रुटी असल्यास त्यांनी स्वतःकडे असलेल्या शासनमान्य मूळ कागदपत्रांसह व पुराव्यासह या जाहिर प्रकटनाच्या दिनांकापासून दहा (10)दिवसांच्या आत पुढे दिलेल्या प्रक्षेत्रावरील संपर्क अधिकारी/कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून त्रुटींची पुर्तता करावी.अन्यथा प्रक्षेत्र स्तरावरील अभिलेखावरुन व प्राप्त माहितीच्या आधारे प्रसिध्द करण्यात आलेल्या या अंतिम माहितीस आपली मान्यता आहे आणि मंजूरांचे काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरुन ही माहिती अंतिम समजली जाईल.
अधिक माहितीसाठी कृषी चिकित्सालय फळरोप वाटीका तुळजापूर येथील कृषी सहाय्यक होगले विनायक ग्यानोबा मो.नंबर 901133944 यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी यांनी केले आहे.